राष्ट्रीय पीछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा तर्फे रास्ता रोको आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी चौक येथे विविध बारा मुद्द्यांवर तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तत्काळ कार्यमुक्त करावे या मागणीसाठी ओबीसी मोर्चातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  हे आंदोलन प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. प्रतिभा उबाळे, सुमित्र अहिरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

 

राष्ट्रीय पीछडावर्ग (ओबीसी) मोर्चा तर्फे आकाशवाणी चौकात केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तत्काळ कार्यमुक्त करावे या व इतर मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी इव्हिएम हटाव देश बचाव, एनआरएस, सीएए, एनपीआर यांचे कायदे रद्द करा आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी ओबीसी प्रवर्गात 52 टक्के आरक्षण मिळावे केंद्र सरकारने ओबीसीची जात निहाय जनगणना करावी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे कामगारांच्या विरोधात केलेल्या श्रम कायद्या श्रम कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या.  राष्ट्रीय स्तरावर ओबीसी मोर्चातर्फे आकाशवाणी चौकात घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुनील देहडे,विजय सुरवाडे, देवानंद निकम, मनोज सपकाळे, मोहन शिंदे, खुशाल सोनवणे, विनोद अडकमोल, अमजद रंगरेज, शकिर शेख, नितीन गाढे, कुंदन तायडे, शिवाजी नाना पाटील आदी सहभागी झाले होते.

Protected Content