राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत आदित्य भावसारचे सुयश

 

पारोळा, प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांचा नातू आदित्य सुरेश भावसार याने नवी दिल्ली येथील सक्षम राष्ट्रीय स्पर्धा २०१९ मराठी विभागातील इंधन बचाव विषयावरील निबंध लेखन स्पर्धेत यश मिळवून पाच हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

आदित्य हा शिरपूर येथील आर् सी पटेल माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वी चा विद्यार्थी असून बभळाज ता. शिरपूर हायस्कूल मधील उपशिक्षक सुरेश गुरुदास भावसार ‌ व वाघाडी जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका अंजनीदेवी सुरेश भावसार यांचा सुपुत्र आहे . त्याला मुख्याध्यापक पी व्ही पाटील, उपशिक्षक एन् ए चौधरी सह आई- वडिलांचे मार्गदर्शन मिळाले . सम्यक विषयज्ञान, मुद्देसूद मांडणी, सुंदर हस्ताक्षर व आकर्षक लेखन पद्धतीने आदित्यला हे यश मिळाले. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या .

Protected Content