राष्ट्रीय दृष्टिहीन संघातर्फे जिल्ह्यातील दृष्टिहीन बांधवाना दिवाळी भेट

जळगाव, प्रतिनिधी | तेली समाज मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ विभागीय शाखा नाशिकच्या वतीने दृष्टिहीन बांधवांचा दिवाळी भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

राष्ट्रीय दृष्टिहीन संघातर्फे जिल्ह्यातील दृष्टिहीन बांधवाना दिवाळी भेट कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी देशपांडे,शरद कोतवार, समाजसेवक व भाजपा पदाधिकारी मनोज भांडारकर, नगरसेवक महेश चौधरी, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. खातेकर, महाराष्ट्र राज्याचे महासचिव बी.पी.जाधव, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी डी.एस.पाटील, उमेश सोनार, पिंटू डोळसे आदींच्या उपस्थिती होती.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी संघाच्या कार्याचा गौरव करत जळगाव शहरातील दृष्टिहीन बांधवाना आमदार म्हणून नव्हे तर माणुसकीच्या नात्याने मी सर्वोतपरी मदत व उर्वरित गरजू बांधवाना घरकुल मिळवून देण्याचे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे नगरसेवक महेश चौधरी यांनी संघ बळकट करण्याचा सल्ला दिला. तसेच संघाकडून शासनाच्या विविध योजना दृष्टिहीन बांधवापर्यंत पोहचवण्याची अपेक्षा व्यक्त केली. जैन उद्योग समुहाचे प्रतिनिधी देशपांडे यांनी संघास वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्याचे महासचिव डी. पी. जाधव यांनी मार्गदर्शन तर केलेच त्याचबरोबर २ गरजू अंध व्यक्तींना स्वयंरोजगाराची ५ हजार रु. धनादेश वाटप केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी श्री. देशपांडे हे होते. सूत्रसंचालन श्री. सपकाळ यांनी तर आभार उज्वला सोनवणे यांनी केले. याश्वितेसाठी संघाचे उपाध्यक्ष मंगेश शेवाळे, सचिव उज्वला सोनवणे, अध्यक्ष साहेबराव पगारे, महासचिव सुरेश गांगुर्डे, निवृत्ती डोळसे. आकाश बाविस्कर, स्वप्नील चौधरी आदींनी कामकाज पहिले. दिवाळी भेटीच्या कार्यक्रमास बाफना नेत्रपिढी व जैन उद्योग समूह सागर चौबे, कन्हैय्या भावसार, दिलीप चौबे आदी दानशूर व्यक्तींनी दिवाळी भेटीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले

Protected Content