यावल, प्रतिनिधी | येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया राष्ट्रीय गणित दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या घेण्यात आली . या स्पर्धेत सुजय वाघोदे याने प्रथम तर फरीदा तडवी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून आय.क्यू.ए.सी., गणित विभाग व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयाची आभासी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेत खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव क्षेत्रातील एकूण ४३१ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रथम सुजय सुधीर वाघोदे (नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), द्वितीय फरिदा गुलशेर तडवी (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल), व तृतीय दिव्या वारके (कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. याबद्दल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, प्रा. संजय पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे आयोजन गणित विभाग प्रमुख प्रा. एस. आर. गायकवाड यांनी केले.