Home क्रीडा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

0
34

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्कूल किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलतर्फे हौशी मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

 

स्कूल किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित हौशी मॅरेथॉन स्पर्धात  पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्तमम प्रतिसाद देत भाग घेतला.  मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली होती. यास्पर्धेत सुमारे पाचशे  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेला प्रमुख पाहुणे  अप्पर  पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.   स्पर्धा काव्यरत्नावली चौक ते बॅरिस्टर निकम चौक पुन्हा काव्यरत्नावली चौकात येऊन समाप्त झाली. किड्स गुरुकुलचे फाउंडर  आदेश ललवाणी तसेच युवासेनेचे राज्याचे सचिव विराज कावडिया स्कूलच्या प्रिन्सिपल मीनल जैन , व्हॉइस प्रिन्सिपल  ममता खोना, कृती जैन, मिलन साळवी , युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप , शाळेचे क्रीडा शिक्षक सागर सोनवणे,  जहीर  शेख, मेहुल इंगळे तसेच इतर शिक्षक व पालक उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.


Protected Content

Play sound