यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महीलांच्या घरातील कुटुंब प्रमुख हे मरण पावल्याने त्यांना राज्य शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धनादेश वितरणाचा कार्यक्रम आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावल येथील तहसील कार्यालयात आज रविवार दि. २ जानेवारी रोजी शासनाच्या वतीने दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कमाविता कुटुंब प्रमुख दगावल्याने त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदतीचा हात म्हणुन राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत तालुक्यातील २४ लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबास २० हजार रुपयांचे धनादेशाचे वितरण आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या २४ लाभार्थ्यांमध्ये यावल चार लाभार्थी ,अट्रावल चे दोन लाभार्थी, बोरखेडा खु॥ एक ,फैजपुर चार , बोरावल खु दोन, न्हावी प्रगणे यावल दोन लाभार्थी , बामणोद. चार , अंजाळे एक लाभार्थी , परसाडे एक लाभार्थी , सांगवी बु॥ दोन लाभार्थी , हिंगोणा एक लाभार्थ्यांचा समावेश आहे. या २४ जणांना एकुण दोन लाख चाळीस हजार रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, यावल शहर काँग्रेस अध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे , यावल तालुका काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह मुसा शाह , माजी नगरसेवक गुलाल रसुल गुलाम दस्तगीर, तहसीलदार महेश पवार , संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार बबीता भुसावरे व रवींद्र मिस्रि आदी प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांनी केले.