राष्ट्रवादी महानगरतर्फे हाथरस येथील घटनेचा निषेध; नराधमांना कठोर शिक्षेची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी। हाथरस येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी जलद गतीने न्यायालयीन खटला चालवावा, या मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका गावात १९ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची जिभ कापून, मानेचा मनाका मोडून पाय निकामी केला. पुर्णपणे शरीर अपंग केले. तसेच तिचा खून करण्यात आला. सदर घटना ही अतिशय दुदैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घृणास्पद घटनेचा राष्ट्रीवादी युवती काँग्रेसतर्फे जाहीर निषेध केला. निवेदना पुढे म्हटले आहे की, आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार वाढतच आहे. भारताला स्वातंत्र होवून ७० वर्षे झाली तरी परिस्थिती तिच आहे. महिला व युवती सुरक्षित नाही. अशी परिस्थिती लक्षात घेता अश्या प्रकरणांना आळा घालण्याकरीता व माणुसकीच्या नावावर कलंक असणाऱ्या नराधमांना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेची दखल घेवून पिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले, जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, किरण तायडे, प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, स्नेहल शिरसाट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/327577148523619/

Protected Content