जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाली आहे. याला जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभेत जळगाव जिल्ह्यात अपेक्षित यश मिळाले नाही, केवळ एकच जागेवर विजय मिळविता आला. त्यामुळे पक्षाचे नेते शरद पवार यानीं जिल्ह्याकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जळगाव जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल आठ आमदार होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोठा फटका बसला, पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार यानीं विशेष लक्ष दिले आहे. खासदार सुप्रिया सुळे ह्या जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकितच जिल्हाला एक दमदार संपर्कमंत्री दिला जाईल अशी घोषणा केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फेसंपर्कमंत्र्यांची यादी लवकरच जाहिर होत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री म्हणून उपमुखमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी मंत्री एकनाथराव खडसे, गिरीश महाजन हे भाजपचे दिग्गज नेते आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा संपर्कमंत्री म्हणून नियुक्त होत असल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राजकाणाला वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांनाही बारामतीत हरवू शकतो, असे आव्हान दिले होते. आता तेच अजित पवार जळगावाचे राष्ट्रवादीसाठी संपर्कमंत्री होणार आहेत. त्यामुळे अजितदादा विरुद्ध महाजन असा सामना येथे रंगणार आहे.