जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेसह राज्याचे कृषी मंत्री आणि जलसंपदा मंत्री यांचेश अन्य मंत्री धरणगाव तसेच जळगाव येथे नियोजित कार्यक्रमानिमित्त शुक्रवार १५ एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शुकवार १५ एप्रिल रोजी चांदसर ता. धरणगाव येथे कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सकाळी ९ वाजता जळगाव विमानतळावर आगमन व तेथून वाहनाने धरणगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तर कृषी मंत्री दादा भुसे, दुपारी 3 वाजता जळगाव येथे येत आहेत. जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, कृषी मंत्री ना. भुसे, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे हे जी.एस. मैदानावर दुपारी चार वाजता होणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चा आयोजीत महिला समृद्ध संकल्प परिषद कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.