Home Cities जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण व हुतात्म्यांना अभिवादन

राष्ट्रवादी कार्यालयात ध्वजारोहण व हुतात्म्यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आज सकाळी क्रांतीदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तर जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आज दिवसभर क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आकाशवाणी चौकातील गणपती नगरातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कार्यालयात आज सोमवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयाच्या बाहेर जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर क्रांतीदिनानिमित्त हुतात्मांना अभिवादन  केले. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, मंगला पाटील, मिनाक्षी चव्हाण, संजय पवार, एजाज मलीक, वाल्मिक पाटील, नामदेव चौधरी, वाय.एस.महाजन, स्वप्निल नेमाडे, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, संजय चव्हाण, सुनिल माळी, सलीम इनामदार, मजहर पठाण, मौलाना साबरी, अनिरूध्द जाधव, अशोक सोनवणे, किरण राजपूत, राहूल टोके, नामदेव पाटील,  राजू बाविस्कार आदी उपस्थित होते. 

 


Protected Content

Play sound