राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानास खोटे नगर येथून शुभारंभ (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. यानुसार जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते फित कापुन सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला.

 

सदस्यता नोंदणी अभियान शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , महिला आघाडीच्या महानराध्यक्षा मंगलाताई पाटील , विनोद देशमुख , योगेश देसले , वाल्मिक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे , किरण राजपूत , दिलीप माहेश्वरी , विशाल देशमुख, दुर्गेश पाटील , मजहर पठाण , अकील पटेल , ॲड. कुणाल पवार , रहीम तडवी , अशोक सोनवणे , सौ. आशा अंभोरे , जीतू बागरे , संजय हरणे , संजय जाधव , मूविकोराज कोल्हे , राहुल टोके इत्यादी प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोटे नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुशील शिंदे , सूर्यकांत भामरे , दिप पाटील , कुणाल ठाकूर , शुभम हिरे यांनी केले. या सदस्यता नोंदणी अभियानात खोटे नगर परिसरातील १९३ नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असून सदस्यता नोंदणी अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/687009402657985

 

Protected Content