यावल, प्रतिनिधी । येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे आज सकाळी १० वाजुन १o मिनिटानी अपंग व्यक्ती गोपाळ काकडे यांच्या हस्ते पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित ध्वजारोहण करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी , सुखदेव नाना बोदडे, युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अॅड .देवकांत पाटील, फैजपूर शहर अध्यक्ष अन्वर खाटीक, अय्युब खान, गनी खान, किशोर माळी,हेमंत येवले, किसान सेलचे नानाजी पाटील , राकेश सोनार, बापू जासूद ,राष्ट्रवादी ओ .बी .सी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , अरुण लोखंडे, कामराज घारू ,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष व्दारकाबाई पाटील आदी उपस्थित होते. यानंतर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने यावल तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी जाऊन २१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर कोरोना रोगप्रतिबंधक आर्सेनिक एल्बम ३०च्या औषधीचे मोफत ग्रामीण परिसरात वितरण मोहराळे , सावखेडा सिम या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात वाटप करण्यात आले. वृक्षारोपण व औषधी वाटप कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष अॅड . देवकांत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, कामराज घारू, अरुण लोखंडे ,किशोर माळी ,निवृत्ती पाटील , गजू पाटील , वसंत पाटील उस्मान तडवी आदींनी उपस्थित राहुन परिश्रम घेतले.