जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वाजता शहरात भव्य ‘ जवाब दो, निषेध मोर्चा ’ चे आयोजन करण्यात आले आहे. देशात आणि राज्यात वाढलेल्या बेरोजगारीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चात पक्षाचे आमदार डॉ. सतीश पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अरुण पाटील, संतोष चौधरी, दिलीप सोनावणे, तसेच अनिल पाटील, संजय गरुड, आणि पक्षाचे सगळे जिल्हा, तालुका, शहर शाखांचे पदाधिकारी, जि.प. व पं.स. सदस्य, आजी-माजी नगरसेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवक जिल्हा अध्यक्ष ललित बागुल व शहर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केले आहे.