भुसावळ प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष तथा जळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांची उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सूचनेनुसार संघटना बळकटीकरण, नवीन कार्यकर्त्यांचा समावेश करण्यासाठी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी उमेश नेमाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे.
यापूर्वी उमेश नेमाडे यांनी पक्ष संघटनेत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस भुसावळ शहराध्यक्ष, युवक जिल्हा सरचिटणीस, युवक जिल्हा संघटक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, ओबीसी जिल्हाध्यक्ष पदांवर काम केले असून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे आता विभागीय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नेमाडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष आहेत. उमेश नेमाडे यांच्या निवडीने जिल्हा निरीक्षक करण कलाटेची विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीवदादा देशमुख, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप सोनवणे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह सर्वांनी अभिनंदन करून सर्वत्र स्वागत होत आहे.