वरणगाव दत्तात्रय गुरव । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बेशर्मी वृक्षाचे वृक्षारोपण करून ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.
वरणगाव शहरातील बस स्टॉप ते स्टेशन रोड या रस्त्याचे तीन महिन्यापूर्वी स्थानिक आमदार निधीतून काम करण्यात आले होते. परंतु, पहिल्याच पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा निषेध करण्यासाठी वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये बेशरमीच्या वृक्षाचे आज वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करून ठेकेदारांनी केलेल्या खराब कामाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तात्काळ रस्त्याचे काम करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने याठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/358845915720910