Home Cities जळगाव राष्ट्रवादीतर्फे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

राष्ट्रवादीतर्फे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

0
30

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्व. अण्णाभाऊ साठे जयंती  व स्व. लोकमान्य टिळक पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात स्व. अण्णाभाऊ साठे जयंती व स्व. लोकमान्य टिळक पुण्यतिथी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील व अशोक लाडवंजारी यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सुनील माळी, संजय चौहान, मजहर पठाण, साहिल पटेल, सलीम इनामदार, किरण राजपूत, अमोल कोल्हे, निल पवार, डॉ. अभिषेक ठाकूर, संतोष चाटे, राजू मोरे, चंद्रकांत कोळी, इम्रान पटवे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound