राष्ट्रवादी आमदाराच्या लहान भावाचा अपघाती मृत्यू !

भंडारा (वृत्तसंस्था) कारने घरी जात असताना राष्ट्रवादीचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांचे लहान भाऊ बालू (रामेश्वर) कारेमोरे यांचे रात्री अपघाती निधन झाले आहे.

 

बालू कारेमोरे हे रात्री वरठी इथल्या राईस मिलमधून आपल्या कारने घरी जात असताना ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत असून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाती ट्रकला ताब्यात घेतले आहे.

Protected Content