नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे.
छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती दोन दिवसांच्या हरिद्वार दौऱ्यावर जाणार होते, पतंजली योगपीठाचा जो पदवीदान समारंभ आहे, यामध्ये राष्ट्रपती सहभागी होणार होते. मात्र मध्येच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा हा दौरा रद्द करावा लागलेला आहे.