रावेर प्रतिनिधी । रावेर व सावदा या दोन ठिकाणी शिवभोजन केंद्रसाठी मान्यता मिळाली आहे. यासाठी इच्छुक संस्थांनी १३ एप्रिलपर्यंत तालुका पुरवठा विभागात अर्ज करण्याचे आवाहन महसूल विभागातर्फे करण्यात आले आहे.
याबाबत असे की, रावेर व सावदा येथे प्रत्येकी एक शिवभोजन केंद्र स्थापन करावयाचे आहे. येथे किमान शंभर शिवीभोजन थाळीस शासनाने मंजूर दिली. इच्छुक संस्थांनी येणाऱ्या १३ एप्रिलपर्यंत तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी शिव थाली भोजन केंद्रासाठी केंद्र चालकाकडे स्वत:ची जागा असणे बंधनकारक असून किमान २५ व्यक्तींना जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. तसेच शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार असून याबाबतचे परिपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे.कोणालाही शासनाच्या अटी-शर्ती नुसारच अर्ज करायचा आहे. तरी इच्छुक संस्था चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन महसूल विभागातर्फे केले आहे.