Home क्राईम रावेर शहरात वीज चोरट्यांविरोधात धडक मोहीम

रावेर शहरात वीज चोरट्यांविरोधात धडक मोहीम

0
37


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात विज चोरी करणारे २२ जणांविरुध्द महावितरण विभागाने कारवाई केली आहे. यामुळे विज चोरी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरातील राजीव पाटील नगर, रोकडा हनुमान नगर, विश्वकर्मा नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरात उप कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांचा मार्गदर्शनाखाली वीज चोरी पकडण्यात आली. यावेळी विविध ठिकाणच्या २२ लोकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी साहयक अभियंता दिलीप सुंदराणी, समीर तडवी, गणेश दहीभात, श्रीकृष्ण बर्कुल, मुकेश ठाकरे, संतोष जाधव व  सतीश चौधरी, भिका साळुंखे, चंद्रकांत ठाकूर, चेतन भरते, अरुण माळी, कल्पेश पाटील, महेश चौधरी आणि आदी कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound