Home Cities रावेर रावेर शहरात गारपीट; परिसरात अवकाळी पाऊस

रावेर शहरात गारपीट; परिसरात अवकाळी पाऊस

0
26

रावेर प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील काही भागांमध्ये आज सायंकाळी अवकाळी सरी कोसळल्या असून शहरात सौम्य प्रमाणात गारपीट झाली आहे.

आज दुपारपासूनच वातावरणात बदल जाणवत असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. यात प्रामुख्याने भुसावळसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पहूरसह परिसरातील पाऊस झालेला आहे. तर रावेर शहरासह तालुक्यातही अनेक गावांमध्ये आज सायंकाळी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. यात शहरात सात वाजेनंतर लहान आकाराच्या गारा पडल्या. शहरात थोडा वेळ गारा पडल्यानंतर पाऊस सुरू झाला आहे. यामुळे वातावरणात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज गायब झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर या पावसाचा पीकांना फटका पडणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.


Protected Content

Play sound