रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरासह रसलपूर गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे उघडकीला आले आहे. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झाल आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस अधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील रसलपुर येथे घरी कोणी नसल्याची संधी साधुन घरफोडी केली तर रावेर शहरा मध्ये छत्रपती शिवाजी चौकात शांताराम महाजन हे पत्नी सोबत सिहोर (मध्य प्रदेश) येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली व ऐवज लंपास केल्याची माहीती आहे. यामुळे भितीच वातावरण निर्माण झाल आहे. घटनेची माहीती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. रावेर परिसरात वाढत्या चोऱ्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करीत आहे. चोरीच्या घटनेबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.