रावेर येथे चोरीतील दोघा फरार संशयीतांना अटक

WhatsApp Image 2020 01 23 at 4.06.11 PM

रावेर, प्रतिनिधी | येथील जीआयएस कॉलोनीमध्ये ३१ डिसेंबर रोजी चोरी करतांना एकास अटक तर दोघ संशयीत फरार झाले होते. त्या दोघांना रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जीआयएस कॉलोनीमध्ये ३१ डिसेंबर २०१९ रोजी मयूर प्रकाश महाजन यांच्या घराबाहेर सेवलसिंग सिंधू मांगीलाल बारेला (वय ३०, रा. वाघरीया अंबाखेडा ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्य प्रदेश) हा संशयीतरित्या उभा असल्याचे पोलीस पथकाला आढळून आला होता. त्यास पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. यातून पोलिसांना संशय बळविल्याने पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार रामा (रामू) रमेश बारेला (वय, २५ रा. कोठा बुजुंग ता. झिरण्या जि. खरगोन मध्य प्रदेश) व दलसिंग (चिम्या) मांगीलाल बारेला (वय २२, रा. आंबेखेडा जमाफल्या ता. भागवानपुरा जि. खरगोन, मध्य प्रदेश) चोरीसाठी घरात असल्याचे सांगितले. याची दखल घेऊन पोलिसांनी महाजन यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता तेथून दोघे संशयीत काही चोरी न करताच पळून गेले होते. तपास अधिकारी एएसआई इस्माईल शेख यांनी २२ दिवसांनी अटक केली. आरोपींना पकडण्यासाठी पो. नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय ललिकुमार नाईक, एएसआय इस्माईल शेख, हे. कॉ. दशरथ राणे, हे. कॉ. जमील शेख,हे कॉ. गुलाब सैदाने, पो. कॉ. भरत सोपे, पो. कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ. उमेश नरवाडे, पो. कॉ. मनोज मस्के, पो, कॉ महेंद्र पाटील यांनी कामगिरी केली

Protected Content