रावेर प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचे काम बंद झाले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून गरजूंनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सुदैवाने रावेर तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नाही. मात्र येणारा पुढील माहिना महत्वाचा आहे. यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात हातमजूरांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आली आहे. आज झालेल्या तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगरांना रोजगार मिळणार आहे. म्हणजे हाताला काम मिळाल्यानंतर त्यांची उपासमारी होणार नाही. शेवट्या घटकापर्यंतच्या माणसाच्या हाताला काम मिळावे यासाठी ग्रामपातळीवरील सरपंच आणि उपसरपंच यांची नेमणूक केली आहे. समितीत समन्यवय साधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तसेच पालक अधिकारी च्या माध्यमातून उद्धभवलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न राहणार आहे. बाहेरून आलेल्या तरूण व नागरिकांनी स्वत:हून घरातच वेगळ्या खोलीत विलीगीकरण व्हावे, जेणे करून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रातांधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे.
रावेर, यावल, फैजपुरच्या जनतेला नागरिकांना रोजगार मिळविण्यासाठी प्रशासनाशी थेट संपर्क करण्याचे अवाहन केले आहे. यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे, गटविकासाधिकारी डॉ.सोनिया नाकाडे, रावेर पालिका मुख्यधिकारी रविंद्र लांडे आदी उपस्थित होते.