रावेर प्रतिनिधी । रावेर, यावल तालुक्यात सीसीआयतर्फे येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करणे थांबले आहे. केंद्रावर नाव नोंदणी केलेल्या दोन्ही तालुक्यातील कापसाची खरेदी पुन्हा थांबल्याने २९६ शेतकरी अडचणीत सापडला आहे.
रावेर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या १० जानेवारीपर्यंत ३२०० क्विंटल कापसाची खरेदी झाल्यावर सीसीआयने हि खरेदी बंद केली होती. २० मे रोजी हि खरेदी सुरु करण्यात आली त्यानंतर ४ दिवस कापसाची खरेदी केल्यावर पुन्हा ३ जूनपासून खरेदी बंद करण्यात आली आहे. या ४ दिवसांत १ हजार ७७९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. रावेर तालुक्यातील २४६ व यावल येथील १२९ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केलेल्या एकूण ३७५ शेतकऱ्यांपैकी ७९ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे. तर २९६ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी रखडली आहे.