रावेर बाजार समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

रावेर प्रतिनिधी । रावेर कृषी उपन्न बाजार समितीला २० मार्च २०२१ पर्यंत पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचा आदेश आज पणन विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी काढला आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती निळकंठ चौधरी आपल्या सहकार्यासह मुंबईत ठाण मांडून होते.त्यांनी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुदतवाढ मिळावी म्हणून पाठवपूरा केला होता.

केळी आगारातील महत्वाची बाजार समिती असलेली रावेर कृषी उपन्न बाजार समितीची पंचवर्षिक निवडणुकीची मुदत २० सप्टेंबर २०२० संपत होती.परन्तु कोरोना महामारीचा उद्रेक बघता महाराष्ट्रत इतर बाजार समित्यांना शासनाने मुदतवाढ दिली होती. तर काही ठिकाणी प्रशासक बसविण्यात आले होते. जिल्ह्यातील महत्वाची बाजार समिती असलेली रावेर कृषी उपन्न बाजार समितीला देखील मुदतवाढ मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा माजी बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी हे मुदतवाढ संदर्भातील प्रस्ताव व पत्रव्यवहारासाठी मुंबईत आहे. अखेर आज रावेर बाजार समितीला २० मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्याचा आदेश पणन मंत्रालयाने काढले आहे.यासाठी त्यांना आमदार शिरीष चौधरी माजी सभापती पितांबर पाटील,यांचे सहकार्य लाभले तर पत्रव्यहारासाठी बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी मदत केली.

मुदतवाढसाठी सर्वांच सहकार्य लाभले
रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या मुदतवाढ व्हावी म्हणून मी तीन दिवसांपासून मुंबईत आहे. येथे सहकार व पणन मंत्र्याना भेटून मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न केले त्याला आज यश आहे. मुदतवाढीचा आदेश आम्हाला मिळाला आहे, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती माजी सभापती निळकंठ चौधरी यांनी सांगितले.

Protected Content