रावेर, प्रतिनिधी । रावेर पोलीसांनी मध्य प्रदेशात जाऊन महाराष्ट्रात अवैध पध्दतीने गुटखा विक्री करणाऱ्या मालकाला बऱ्हाणपुरातून अटक केल्याची घटना काल घडली आहे यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर पोलिस पेट्रोलींग करत असतांना अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर वाघोड फाट्या नजिक महाराष्ट्रमध्ये बंदी असलेला गुटखा एमएच १९ बीसी ५०८७ मोटर सायकलवर घेऊन जातांना वाजिद फारुख शेख (वय १९ रा रसलपुर) यास पोलिसांनी पकडले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून गुटखासह ३१ हजार ६१८ रुपयाचा मुद्देमाल रावेर पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला होता. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या परवानगीवरुन पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरीक्षक मनोज वाघमारे, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ. मनोज मस्के,पो. ना. नंदू महाजन यांनी ही कारवाई केली आहे.