अर्णबची सुटका लांबणीवर

मुंबई: : वृत्तसंस्था । आता तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच उद्या अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब यांना आजची रात्रही न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे.

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीला आव्हान देत अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आज सुनावणी झाली

‘अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने १६ एप्रिल २०१९ रोजीच पोलिसांचा ए-समरी अहवाल स्वीकारून हे प्रकरण बंद केलं होतं. त्याला पीडित नाईक कुटुंबानं आव्हान दिलं नाही आणि तो अहवाल आजही तसाच आहे. पोलिसांनीही पुन्हा तपास सुरू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नसून स्वत:हूनच फेरतपास सुरू केलाय. कायद्यानुसार याला परवानगीच नाही. त्यामुळे गोस्वामी यांचे गजाआड राहणे पूर्णत: बेकायदा आहे’, असा युक्तिवाद गोस्वामींसाठी त्यांच्या वकिलांनी मांडला. मात्र, फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश करू शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं जामिनावरील सुटकेविषयी उद्या दुपारी सुनावणी ठेवली.

अर्णब गोस्वामी प्रकरणात दिवंगत अन्वय नाईक यांची कन्या आज्ञा नाईकनेही मुंबई हायकोर्टात धाव. घेत पोलिसांनी गेल्या वर्षी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला फौजदारी रिट याचिकेद्वारे आव्हान. दिले आहे

आम्ही नोटीस जारी करून तक्रारदार आणि राज्य सरकारला उत्तर देण्याची संधी देऊ आणि उद्या जामीन अर्जाविषयी सुनावणी घेऊ असे हायकोर्टाने सांगितले .

Protected Content