रावेर : प्रतिनिधी । रावेर पुरवठा विभागाच्या कथित प्रकरणाच्या चौकशीत रावेर तालुक्यातील १४८ रेशन दुकानदारांचे जबाब मंडळ अधिकार्यांनी घेतले आहेत.
शासकीय अर्जात परस्पर बदल , अनुमती नसताना अर्ज छापून विक्री , राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे अर्जांची विक्री या कारणावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्कालीन पुरवठा निरिक्षकांची बदली केली या प्रकरणात अजुन एखाद्या अधिका-यांनी कर्तव्यात कसूर केला का? याकडे आता लक्ष लागले आहे. फैजपुर प्रांतधिकारी कैलास कडलक हे चौकशी अधिकारी आहे.