रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या नविन वसाहतीच्या चारही जागांसाठी येत्या जानेवारीत निवडणुक आहे. यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. यामुळे येथून इच्छुक असणाऱ्यांवर चार ही पक्षा लक्ष ठेवून आहे.
रावेर नगरपालिकेच्या नविन वसाहतीमध्ये येत्या जानेवारीमध्ये ४ जागांसाठी निवडून होत आहे. ही निवडणुक झाल्यानंतर सुमारे ११ महिन्यानंतर रावेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. यामुळे पालिकेची सेमीफायन निवडणुक म्हणून सुध्दा या ४ जागांकडे चारही पक्षांची नजर आहे. चारही जागा कॉग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले तर स्थानिक पातळीवर शिवसेना देखील चारही जागा लढवुन आगामी सार्वत्रीकची चाचपणी करणार असल्याचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन यांनी सांगितले तर राष्ट्रवादी देखील स्वतंत्र लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी म्हणाले. भाजपा सरकारच्या काळात हद्दवाढ झाली असून या भागाच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आम्ही भाजपाचे चारही उमेदवार देऊ व निवडून देखील आणू असे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनी सांगितले.