रावेर पंचायत समितीत दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी विविध योजनांची माहिती मिळावी म्हणून दिव्यांग बांधवांना सल्ला व मार्गदर्शन कक्ष रावेर पंचायत समितीमध्ये स्थापन केले असून याचा तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्याचे अवाहन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

आज रावेर पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना सल्ला व मार्गदर्शन कक्षाची स्थापना आज पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती जुम्मा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका भरातुन मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थितीत होते.

हे कक्ष सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तांलय तसेच जिल्हा समाज विभाग अंतर्गत पंचायत समितीमध्ये दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिव्यांग बांधवाना मार्गदशन केले. यावेळी ग्राम पंचायत विस्तार अधिकारी श्री. सोनवणे यांनी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दिव्यांग बांधवाना यावेळी स्वावलंबन कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिव्यांग कक्षचे परिचारक अरविंद पाटील यांनी केले तर सहकार्य सलमान पठाण यांनी केले. यशस्वीतेसाठी प.स.कर्मचारी व सावदा शाळेचे कर्मचारी सलमान पठाण ,गोपाळ शिंगोटे ,अमोल चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content