रावेर : प्रतिनिधी । प्रशासनाच्या कुशल रणनीतीमुळे रावेर तालुक्यात ४८ ग्राम पंचायतीच्या निवडणूक शांततेत पार पडल्या आता निकालाची उत्सुकता तालुक्याला लागली आहे
.येत्या सोमवारी सकाळी दहा वाजल्या पासुन मतमोजणी सुरुवात होणार आहे. तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या निवडणुकीत कुठेही आचारसंहिताभंगचा प्रकार घडला नाही.
रावेर तालुक्यातील ४८ गावांची टक्केवारी पुढील प्रमाणे गौरखेडा ९४.२६ खिर्डी खु ७८.३६ तामसवाडी ८७.५४ मस्कावदसिम ८४.६४ मस्कावद खु ६७.३८ मस्कावद बु ७९.५० धामोडी ८६.१२ पुनखेड़ा ८८.६९ मोरगांव बु ८९.३० मोरगांव खु ८०.२८ शिंदखेडा ७५.८३ रायपुर ७९.७२ गहुखेडा ८७.३९ उदळी खु ७७.६४ उदळी बु ८४.०१ तासखेडा ८६.०० पाडळे खु ९३.४७ अजनाड-चोरवड ९३.६८ मुंजलवाडी ८९.११ खिरोदा प्र रावेर ९१.९१ खानपुर ७९.७९ निरुळ ८२.२४ भोकरी ८६.७० तांदलवाडी ८१.६७ मांगलवाडी ९०.७८ पूरी-गोलवाडे ८०.६३ भोर ८६.४८ कोचुर बु ८४.६६ कर्जोत ८०.९८ वाघोड ८३.४२ के-हाळा खु ८३.६१ के-हाळा बु ८४.१३ वघाडी ८५.५१ रसलपुर ८२.४६ रमजीपुर ९४.२५ बक्षीपुर ८९.१९ निंबोल ८१.३८ ऐनपुर ७३.३५ वडगाव ८९.२२ रेंभोटा ७९.०५ दसनुर ८२.८५ कोळोदा ९५.२४ अहिरवाडी ८२.०४ विवरे खु ७५.९४ सुदगाव ८०.४८ निंभोरा बु ७७.५९ विवरे बु ८०.४२ सुलवाड़ी ९१.३७ टक्के मतदान झाले तालुक्यात ८१.९७ टक्के मतदान शांततेत पार पडले आहे.