रावेर प्रतिनिधी । रावेर महसुल विभागाची महत्वपुर्ण बैठक आज घेण्यात आली. यात शेतकऱ्यांसाठीच्या योजना लवकरात लवकर राबवाव्या अश्या सुचना प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिल्यात.
रावेर महसुल विभागातर्फे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक सुचना देण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांनी शेतसारा भरण्याचे आवाहन देखिल करण्यात आले आहे. रावेर तहसिल कार्यालयात महसूल विभागाची तलाठी व मंडळ अधिकारी यांचा विविध योजना व वसूली संदर्भात आढावा बैठक प्रांतधीकारी अजित थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यामध्ये महसूल वसूली १०० टक्के करणे, अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालणे, शेतकरी बांधवांची पीएम किसान योजना संदर्भात येणाऱ्या त्रुटी लवकर दुरुस्त करून त्यांची समस्या सोडवा, शेतसारा व अकृषिक करची वसूली कर्जमाफी यासह अनेक महसूलच्या विविध विषयासंदर्भात प्रांतधिकारी अजित थोरबोले यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसिलदार संजय तायडे, सी.एच.पवार आदी बैठकीला उपस्थित तलाठी, मंडळ अधिकारी देखिल उपस्थित होते.