रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा आज रावेर तालुक्याचा दौरा आहे. रावेर कोवीड केअर सेंटरला भेट देवून सोई-सुविधांची पाहणी करणार आहेत.
रावेर तालुक्यात २८ जुलै पर्यंत कोरोना बाधितांचा आकडा ६७३ वर पोहचला आहे. लवकरच सातशेचा उंबरठा गाठणार आहे. तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत आरोग्य विभागाला काय सुचना व निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी व समस्या आहेत. कापूस खरेदी केंद्र तांत्रिका कारणांमुळे बंद आहे. तर दुसरीकडे मका खरेदी केंद्राला दिलेली मुदत अल्पकालावधिची आहेत. रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमके काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.