रावेर तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसाठी प्रांताधिकारी कैलास यांच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी नव्याने आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या.

सूदगांव येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी तर भोर येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी), विवरे खुर्द व मस्कावद सिम येथील सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.  रेंभोटा येथील सपना आनंदा सपकाळे यांनी आरक्षण काढण्याला आक्षेप घेतल्याने त्यांचा  प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आलं आहे.

 

 

Protected Content