रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. दरररोज हजारो ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याने प्रशासनाचा मोठा महसूल बुडत आहे.
रावेर तालुक्यासह जिल्ह्यात वाळूचा कोणताही लिलाव झालेला नाही. अश्या परिस्थितीत वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत असून याची अवैधरित्या वाहतूक दिवस रात्र सुरू आहे. महसुल विभागाच्या कारवाया सुरू असतांना त्यांच्या कारवाईला केराची टोपली देत वाळू वाहतूक धारक वाळूची चोरटी वाहतूक केले जात आहे. भोकर नदी पत्रातून देखील मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक केली जात आहे. यासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी प्रांताधिकारी कैलास कडलक यांना वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.