Home क्राईम रावेर तालुक्यातील पुन्हा अवैध धंद्यांची चलती

रावेर तालुक्यातील पुन्हा अवैध धंद्यांची चलती

0
23

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मध्यंतरीच्या विरामानंतर तालुक्यात पुन्हा एकदा अवैध धंद्यांची चलती सुरू झाली असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 

या संदर्भातील वृत्त असे की, रावेर तालुक्यासह परिसरात दोन नंबरचे धंदे सुरु झाल्याची माहिती मिळत असुन मध्य प्रदेशचे लोक संवेदनशील रावेर शहरासह महाराष्ट्रात पुन्हा सक्रीय झाले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे गट नेते आ एकनाथराव खडसे यांनी सट्टा-पत्तेचा प्रश्न विधानसभेत मांडल्या नंतर रावेर तालुक्यातील अवैध धंद्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

 

रावेर सावदा निंभोरा परिसरात अवैध धंद्या बाबत गट नेते एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत अवैध धंदे चालकांची नावे वाचुन दाखवली होती.त्या नंतर रावेर तालुक्यात अवैध धंद्या विरुध्द कारवाया करण्यात आल्या होत्या.तेव्हा पासुन अवैध धंदे बंद होते.अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आल्या परंतु काल पासुन अवैध धंदे धीरे-धीरे पूर्वपदावर येत असल्याची माहिती मिळाली आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound