रावेर तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरु करा

 

रावेर, प्रतिनिधी । रावेर तालुक्यात कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आज बाजार समितीचे सभापती संचालकांनी औरंगाबाद येथे भारत कपास निगम लिमिटेडचे उप महाप्रबंधक अर्जुन दवे यांची भेट घेऊन तात्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जवळ-जवळ सर्व ठिकाणी कापुस खरेदी केंद्र सुरु झाले. परंतु, रावेर तालुक्यात कापुस खरेदी सुरु झाले नाही शेतक-यांचा कापुस घरात पडून असुन नोव्हेंबर महीना संपण्यात आला. परंतु, कापुस खरेदी केंद्र सुरु झाले नाही यामुळे शेतक-यांमध्ये नाराजीचा सुर आहे.

औरंगाबाद येथे भारतीय कपास निगम लिमिटेड चे उपमहाप्रबंधक अर्जुनजी दवे यांची आज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन,माजी सभापती राजीव पाटील,डॉ.राजेंद्र पाटील.निळकंठ चौधरी, सचिव.गोपाल महाजन यांनी भेट घेऊन तालुक्यात कापुस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली

ग्रेडर अभावी आहे खरेदी केंद्र बंद

मागील वर्षी कापुस खरेदी केंद्रला ग्रेडर मिळाला नव्हता अखेर बोदवडच्या ग्रेडरकडे रावेरच्या कापुस खरेदी करण्याची जबाबदारी होती.प्रभारीराज मुळे कापुस अपेक्षीत खरेदी न झाल्याने यंदा सीसीआय’ने रावेरला खरेदी केंद्र सुरु केले नाही.हेच केंद्र पुन्हा सुरु करण्यासाठी बाजार समिती पाठपुरावा करत आहे.

खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार

आम्ही आज कापसाचे महाप्रबंधक श्री.  दवे यांची भेट घेतली असून त्यांनी  रावेरला कापुस खरेदी केंद्र सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.त्यांना खा. रक्षा खडसे व आ.  शिरीष चौधरी यांनी देखील भ्रमणध्वनीद्वारे श्री. दवे यांच्याशी बोलणे झाले आहे. रावेर कापुस खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार आहे असे बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन यांनी सांगितले.

Protected Content