रावेर ग्रामीण रूग्णालयातील कोरोना आपात्कालीन कक्षाची तहसीदारांकडून पाहणी

रावेर प्रतिनिधी । यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना आपात्कालीन कक्ष तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोडची तहसिलदार उषाराणी देवगुणे पाहणी केली. स्वच्छता व कोरोना वायरस संदर्भात खबरदारीचा घेण्याच्या आरोग्य प्रशासनाला निर्देश त्यांनी दिले आहे.

जिवघेणा कोरोना वायरस’चा पादुर्भाव सर्वत्र वाढत असून पुणे, मुंबईकडून रावेर अनेक लोक येत आहे. यापैकी कोणाला सर्दी, ताप, गळादुखी सारखा त्रास झाल्यास आरोग्य प्रशासन किती सज्ज आहे. याची पाहणी तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी केली त्यांनी रावेर ग्रामीण रुग्णालय व वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेट देऊन पाहणी केली यावेळी माक्सची उपलब्धता औषध, सॅनिटायझर, कर्मचाऱ्‍यांची अपुरी संख्या यांच्यावर त्यांनी डॉ.एन.डी.महाजन यांच्याशी चर्चा केली. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत चर्चाकरून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत प्रक्षिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे, कल्पना नगरे आदि महसूल व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content