रावेर बाजार समितीवर खडसे समर्थकांची सरशी !

रावेर प्रतिनिधी । रावेर कृषी उत्पन्न बाजार सामितीच्या सभापतीपदी गोपाळ नेमोड यांची निवड करण्यात आली आहे. नेमाडे हे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या निवडीमुळे पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा रावेर लोकसभा मतदारसंघात मोठा दबदबा आहे. भाजपातून राष्ट्रवादीत आलेले खडसेंनी होमपीचवर निवडणूकांपूर्वी त्यांची ताकद दिसायला सुरुवात झाली आहे. आगामी वर्षभरात रावेर तालुक्यात पंचायत समिती, बाजार समिती, नगर पालिकांसारख्या महत्वाच्या संस्थेच्या निवडणुका होऊ घातले असतांना कट्टर खडसे समर्थक असलेले गोपाळ नेमाडे यांची बाजार समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

कार्यकर्ता सभापती झाला याचा आनंद – माजी मंत्री एकनाथराव खडसे
रावेर बाजार समितीत माझा कार्यकर्ता सभापती झाला याचा मला आनंद आहे. सभापती व उपसभापती दोघेही मला भेटायला येऊन गेले. गोपाळ नेमाडे सारखे अनेक कार्यकर्ते मला मानतात. सद्या ते भाजपात असले तरी ते माझे कार्यकर्ते आहेत. त्यांनी शेतकरी हिताचे काम करावे. आगामी काळात देखील शेतकरी हितासाठी माझी ताकद त्यांच्या पाठीशी असेल. अश्या भावना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लाईव्हच्या माध्यमातुन व्यक्त केल्या.

सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश
माजी मंत्री एकनाथराव खडसे भाजपात असतांना २०१६ मध्ये पुढाकार घेऊन सर्वपक्षीय पॅनल तयार करून आपले कार्यकर्ते निवडून आणले होते. व मर्जीतले सभापती उपसभापती रोटेशन पध्दतीने केले होते.

Protected Content