रावेरात १५ ठिकाणांवर फळ , भाजीपाला विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण (व्हिडिओ)

 

रावेर  ; प्रतिनिधी । कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक दि चैन  म्हणजे  लॉकडाऊन 0:2 सुरु आहे. रावेर शहरात या  अंमलबजावणीसाठी   मुख्यधिकारी रविंद्र लांडे   आज रस्त्यावर उतरले मेन मार्केटमध्ये फळ , भाजीपाला विक्रेत्यांजवळील गर्दी कमी करण्यासाठी त्यांचे वेग-वेगळ्या १५ ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.

आज पासुन लॉकडाऊन 0:2 लावण्यात आले  आहे.आज सकाळी मुख्यधिकारी रवींद्र लांडे, सहायक पोलिस निरिक्षक  शितलकुमार नाईक  पोलिस उपनिरिक्षक मनोहर जाधव, पोलिस व पालिकेचे कर्मचारी घेऊन रावेर शहरात पोलिस स्टेशन, डॉ बाबासाहेब अंबेडकर चौक, गांधी चौक, मेन रोड, पाराचा गणपती आदी ठिकाणी  फळ व भाजीपाला विक्रेते यांना गर्दी होण्याच्या ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी विक्री करण्याच्या सूचना मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी दिल्या  सोशल  डिस्टन्स  व मास्कचा वापर करा तसेच सर्वांनी अँटीजन टेस्ट करून घेण्याचे अवाहन त्यांनी केले.

रावेर शहरात कोरोना व्हायरसचे ५८  पेशंट एक्टिव असून कोविड सेंटरमध्ये ८० जण आहेत.ही साखळी तोडण्यासाठी शहरात मुख्याधिकारी रविंद्र लांडे एक्शन प्लानवर काम करताय. शहरात विना मास्क  व विनाकारण फिरणा-या सुमारे १०० व्यक्तीची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी शहरात पालिकेचे प्रमोद चौधरी, मयूर  तोंडे, दिपक देशमुख , विजय महाजन, सुभाष महाजन, यूसुफ शेख, प्रकाश शिंदे आदी पालिकेचे कर्मचारी बाजारपेठेत  फिरत होते.

रावेर शहरात पालिकेने भाजीपाला व फळ विक्रेते  यांना गर्दी होणाऱ्या ठिकाणावरुन उठवुन शहरातील साईं नगर, पोलिस कवायत, संभाजी नगर, उटखेडा रोड, इदगाह रोड,  भगवती नगर यासह १५ जागा निश्चित करण्यात  आल्या आहे ते येथे उद्यापासुन फळ व भाजीपाला विक्री करू शकणार आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/483569636411970

Protected Content