रावेरात सजंय गांधी निराधार योजनेचे १२०० प्रकरणे मंजुरीच्या प्रतिक्षेत

 

रावेर, प्रतिनिधी । येथे ऑगस्ट २०२० महिन्यांपासून सजंय गांधी निराधार योजनेचे बाराशे प्रकरणे मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत आहे. तर मार्च महीन्यानंतर तहसील कार्यालयात बैठक घेऊन पडताळणी करून मंजूर केले जाणार असल्याचे सजंय गांधी विभागातर्फे सांगण्यात आले आहे. यामुळे तालुकाभरातील वृद्ध, निराधार, गरीबांचे, अपंग बांधवांचे लक्ष पुढच्या होणाऱ्या बैठकीकडे लागले आहे.

रावेर तालुक्यातील गरीब निराधार वृद्ध, अपंग बांधवांनी विविध योजने अंर्तगत लाभ घेण्यासाठी तहसील कार्यलायाकडे अर्ज केला आहे. मागील ऑगस्ट २०२० पासूनचे विविध प्रलंबिल प्रकरणे आहे. जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत फक्त दोनशेच प्रकरणे मंजूर केले होते. परंतु, मागील वर्षापासुनचे सुमारे बाराशे विविध प्रकरणे प्रलंबित आहे. यामध्ये सजंय गांधी निराधार श्रावण बाळ योजना इंदरा गांधी योजना अपंग बांधवांच्या विविध योजना प्रलंबीत आहे. लवकर बैठक घेऊन सोडवण्याची मागणी वृद्ध, अपंग बांधवांमधून होत आहे.

 

Protected Content