रावेर (प्रतिनिधी)। रावेर शहरात तोंडाला माक्स न बांधणाऱ्या १० जणांवर तहसिलदार यांनी कारवाई केली. प्रत्येकाकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे, निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी आज महाराष्ट्र-मध्य प्रदेश चोरवड सिमा नाक्याला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान रावेरकडे येतांना तोंडाला माक्स न बांधणाऱ्या 10 जणांवर तहसिलदार यांच्या पथकाने कारवाई करत प्रत्येकाकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंडळाधिकारी सचिन पाटील, तलाठी दादाराव कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.