रावेर प्रतिनिधी । रावेर नगर पालिकेच तर्फे प्लॅस्टीक विरोधी पथकाने शहरातील तीन दुकानांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. पथकाने आज पुन्हा १५ किलो प्लॅस्टीक जप्त करून १५ हजाराचा दंड ठोकण्यात आला आहे. प्लॅस्टीक विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे
महाराष्ट्रात प्लॅस्टीक बंदी करण्यात आली असून शहरातील काही दुकानांमध्ये चोरुन प्लॅस्टीक विक्री होत असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाली मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.तडवी, धोडू वाणी, एस.एस.काळे, पांडुरंग महाजन, प्रमोद चौधरी, अतुल चौधरी, शेख जावेद, मयूर तोंडे, अशोक महाजन, शांताराम पाटील, यूसुफ खान, अशोक महाजन, विजय महाजन, तुलसीदास जावे यांच्या पथकाने शहरातील स्टेशन रोड वरील सत्यम प्लॅस्टीक, श्रीकृष्ण डेअरी, तसेच शिवशक्ती आइस्क्रीम या तीन दुकानांकडून तब्बल 15 किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले असून तिघांना प्रत्येकी ५ हजाराचा दंड ठोकण्यात आला आहे, तसेच त्या दुकानदारांना सिंगल यूज प्लॅस्टीक न वापरण्या बाबत मार्गदर्शन सुध्दा केले जात आहे यामुळे रावेर शहरातील सर्व अनअधिकृत प्लॅस्टीक विक्री करणाऱ्यांमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच रावेर शहरातील इतर दुकानांची सुध्दा झाडा-झडती घेण्यात आली रावेर शहरात शासनाने नेमुन दिलेल्या कालावधित कारवाई सतत सुरु राहील. नागरीकांनी प्रतिबंधक असलेले प्लॅस्टीक वापरू नये, असे अवाहन पालिकेचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी केले आहे.