रावेर प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारातून २१ हजार रूपये किंमतीचा गोऱ्ह्याची चोरी झाल्याचे शनीवारी दुपारी उघडकीला आले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, रईस खॉ सरवर खॉ (वय-४०) रा. फकिर वाडा हे गुरांचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे विविध प्रकारचे जनावरे आहे. सर्व जनावरांना आठवडे बाजाराजवळील गुरांचा वाडा येथे बांधण्यात येतात. गावातील लखा उर्फ रफिक शेख बिसमिल्ला आणि शेख रहिम शेख सलीम दोन्ही रा. रावेर यांनी १९ फेब्रुवारी रात्री ८ ते २० फेब्रुवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान २१ हजार रूपये किंमतीचा लाल रंगाचा गोऱ्हा चोरून नेले. या संशयावरून रईस खॉ यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयित आरोपींविरूध्द रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.