Home आरोग्य रावेरात कोरोनाचा वाढता संसर्ग ; आमदारांनी उद्या बोलवली सर्वपक्षीय बैठक

रावेरात कोरोनाचा वाढता संसर्ग ; आमदारांनी उद्या बोलवली सर्वपक्षीय बैठक

0
44

रावेर, प्रतिनिधी । जिवघेणा कोरोना व्हायरसचे रुग्ण तालुक्यात रोज वाढताय याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. कोणीही लक्ष द्यायला तयार नाही असा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी तीन दिवसापूर्वी केला होता. याचे वृत्त लाईव्ह ट्रेंड्स न्यूज देखिल प्रसिध्द केले होते. अखेर तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बैठकांचा धडाका सुरु झाला आहे.

रावेर तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसें-दिवस वाढत असून तो आटोक्यात आणण्यासाठी व उपाय-योजना करण्यासाठी काल आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थित निंभोरा, आज चीनवल येथे बैठक घेण्यात आली आहे. तसेच आ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या रावेर तहसिल कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. शनिवार दि २७ जून रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी तालुक्याचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे सांगितला होता.


Protected Content

Play sound