रावेर प्रतिनिधी । इच्छापूर येथील संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह रावेरात आलेल्या इच्छापूर येथील संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रावेरकरांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती अशी की, उटखेडा रोडवरील नातलगांकडे इच्छापूर वरून आलेल्या जावाईला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्या संपर्कातील शहरातील दोन हॉस्पिटलमध्ये तपासणीचे काम (ओपीडी) बंद ठेवण्यात आली होती. यामुळे रावेर शहरात खळबळ उडाली होती. मंगळवारी संशयित रूग्णांचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान आज संशयित रूग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने रावेरकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.