Home क्राईम रावेरात अल्पवयीन मुलाचा रेल्वेच्या धक्काने मृत्यू

रावेरात अल्पवयीन मुलाचा रेल्वेच्या धक्काने मृत्यू

0
26

रावेर, प्रतिनिधी | रावेर शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मूलाला ट्रेनचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरातील शिवाजी चौक येथील रहिवासी लोकेश सजंय महाजन (वय १६ ) हा सकाळ पासुन घरातून निघुन गेला होता. त्यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोधा शोध केला असता त्याचा मृतदेह रावेर रेल्वे स्टेशन नजिक सापडला. कोणत्या तरी ट्रेनच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound