Home क्राईम रावेरातील स्मशानभूमीतून लोखंडी जाळ्यांची चोरी

रावेरातील स्मशानभूमीतून लोखंडी जाळ्यांची चोरी


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी जाळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रावेर शहरातील नागझिरी रोड आणि रसलपूर रस्त्यावरीलस्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारे ८ हजार रुपये किमतीच्या एकूण १२ लोखंडी जाळ्या आरोपी रफीक गढेवाला (पूर्ण नाव माहीती नाही) याने चोरुन नेल्या आहे. ही घटना १ एप्रील ते १२ एप्रीलच्या दरम्यान झाली असून १३ एप्रील रोजी हा विषय उजळीस आला. याप्रकरणी वॉचमन सजंय वसंत महाजन (वय ४८) यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विष्णु भिल, विष्णु पोहेकर तपास करीत आहे.

 


Protected Content

Play sound