Home क्राईम रावेरला बकर्‍या चोरी करणार्‍यांना अटक

रावेरला बकर्‍या चोरी करणार्‍यांना अटक

0
40

रावेर प्रतिनिधी । शहरातून बकर्‍या चोरणार्‍या तीन जणांना रावेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आहे

या बाबत वृत्त असे की दि २९ रोजी रावेर ईदगाह रोडवर सप्तशृगीमाता मंदीरा जवळील शेख अरमान शेख रहेमान उस्मान शेख रहेमान , हाजी इकबाल खान महेमुदखान यांच्या मालकीच्या ९ बकर्‍या (किंमत २९ हजार रुपये) चोरी गेल्या होत्या या प्रकरणी रावेर पोलिसांनी आरोपी ३)नाविद उर्फ नावा शेख ताहेर रा रावेर खाटीक वाडा; नासिर शेख निसार रा खिर्डी ता रावेर व साबीर रफीक खाटीक रा इस्लामपुर सावदा यांच्या विरुध्द रावेर पोलिस स्टेशनला भा . द . वि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्ह्यात आरोपीनां अटक करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली मोटार सायकल जिजे ०३ / डीआर ४७८४ ही जप्त करण्यात आली असुन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि ४ पर्यत पोलीस कोठडी सुनावली असुन गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रामदास आर वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी पाळदे, पोहेकॉ शेख, पोना तायडे पोकॉ . पहुरकर , पोकॉ . भरत सोपे, सुरेश मेढे, जाकीर पिंजारी हे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound